सोमवारपासून तहसील कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण. विद्यार्थी, नागरिक, महिलांना कामा साठी होत आहे त्रास.

0
33
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे/ सोमवार पासून स्थानिक तहसीलच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण पुकारले असून त्यामुळे येथे शैक्षणिक कामानिमित्त येणाऱ्या विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात चतुर्थ व तृतीय श्रेणीच्या कर्मचारी नी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक सत्रामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध प्रवेशासाठी तहसील कार्यालयात यावे लागते, त्याच नागरिकांना आपला रोजगार सोडून कामासाठी तहसील कार्यालयात येतं आहे, त्याच्यात लाडली बहन योजने करिता दाखले चे कामासाठी महिला तहसील कार्यालयात येत आहेत, मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे विद्यार्थी व महिलांची कामे होत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
आमच्याही मागण्या आम्ही मागणी आठ दहा वर्षापासून सरकार जवळ मांडले आहे पण अद्याप पर्यंत शासनाने याच्यावर कोणतेही निर्णय घेतला नाही म्हणून आम्हाला बेमुद्दत संपाचे पाऊल उचलावे लागते,
अंकुश चौवरे, उपाध्यक्ष महसूल विभाग संघटना चांदूर रेल्वे
veer nayak

Google Ad