दिनांक 14 जुलाई ला ठीक 2 वाजेच्या दरम्यान घटना घडली. तालुक्यात सध्या कपूस,सोयाबीन, तूर पिकाचे उत्पन्न घेणे सुरु असून काम करण्यासाठी पुरुष व महिला मजूर वर्ग मुठीत जीव धरून पोटाची खडगी भरण्यासाठी शेतीचे काम करण्यास जात आहेत.
सविस्तर वृत्त असे की, धामनगांव तालुक्यातील मौजा जूना धामनगांव येथील दोन महिला शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पाण्याने रुद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाले असता वीज पडून सरला विलास वडगे वय 35 वर्षे , तर इंद्रकाला बाई टीचकुले 70वर्षे रा. लोयानगर जूना धामनगांव या गंभीर जख्मी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.त्यांना समोरील उपचार साठी यवतमाड़ ला रेफर कर्ण्यात आले आहे