अ.भा.वि.प. धामणगाव शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .गुणवंत विद्यार्थी व पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

0
84
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :- तालुका प्रतिनिधी
स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धामणगाव रेल्वे नगर कार्यकारणी द्वारा धामणगाव रेल्वे तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी वर्गातील मार्च 2024 या वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. विशाल मोकाशे तसेच जिल्हा प्रमुख प्रा. अभिजीत दौड, नगर मंत्री श्रवण देशपांडे ,जिल्हा संयोजक वृषभ गोहने हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख प्रा. अभिजीत दौड यांनी केले. यामध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धामणगाव तालुक्यामध्ये गेल्या वर्षापासून करीत असलेले कार्य याचा आलेख उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्या समोर कथन केला.याबरोबरच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असल्याचे सांगितले . आपल्या या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे गरजेचे असल्याचे सांगितले ज्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना एक नवी प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विशाल मोकाशे यांनी आपल्या भाषणामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्याची भूमिका आणि अभाविप विद्यार्थी हितासाठी कसे कार्य करते या बाबत माहिती दिली. उपरोक्त कार्यक्रम हा विदर्भ प्रांत सह मंत्री आर्या पाचखेडे याचे सह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या स्थानिक धामणगाव शाखेने घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाला तालुक्यातील अपेक्षित सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

veer nayak

Google Ad