आर के ज्ञान मंदिरम येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात. सेल्फी पॉईंट व नयनरम्य सजावट ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू

0
96
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

पुलगाव

स्थानिक आर के ज्ञान मंदिरम इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शैक्षणिक सत्र २०२४- २५ मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या

उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाची सुरवात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती यांच्या पूजनाने झाली. सर्व विद्यार्थ्यांना तिलक करून त्यांचे औक्षवण करण्यात आले व त्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत शाळेचे प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कला शिक्षक प्रवीण दंडारे व सीमा दंडारे यांच्या कल्पकतेने विद्यार्थ्यांसाठी सुंदर व नयनरम्य

सेल्फी पॉईंट बनविण्यात आले होते. सेल्फी पॉईंट व नयनरम्य सजावट हे या कार्यक्रमाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळा समितीचे अध्यक्ष रंजन कुमारजी केजरीवाल , आर के ट्रस्ट चे मुख्य समनव्यक नूरसिंग जाधव, प्राध्यापक जितेंद्र वर्मा, प्राध्यापक गणेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नितीन श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad