जीवक बुद्ध विहार येथे एक दिवशीय करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

0
36
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियान व जीवक बुद्ध विहार समितीच्या वतीने एक दिवसीय करियर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जीवक बुद्ध विहार जुना धामणगाव येथे करण्यात आले होते.
एक दिवसीय कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून प्रमोद हातेकर तर प्रमुख अतिथी म्हणून अभी दरवडे पुलगाव, अरुण राऊत ग्रंथपाल पुलगाव, मधुरंद नांदेकरवर्धा,गणेश सरोदे, राजेश मनोहर आदी मान्यवर या कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर दिपप्रज्वला सर्वप्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातून असो किंवा शहरी भागातून अनेक विद्यार्थी दहावी बारावी झाल्यानंतर काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर नेहमी सतावत असतो त्यामुळे त्यांचा मार्ग खंडला जाऊ शकतो दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे याचे मार्गदर्शन यावेळी पाहुण्यांनी केले. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कशाची गरज आहे या विषयावर सखोल मार्गदर्शन या प्रमुख मंडळींनी विद्यार्थ्यांना केले. या एकदिवसीय कार्यशाळेला धामणगाव रेल्वे तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे मात्र विशेष या कार्यक्रमाचे राहिले.

एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे प्रास्ताविक पपीता मनोहरे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन टाले तर आभार प्रदर्शन सुधीर नगराळे यांनी मानले. एकदिवसीय कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता सर्वश्री जीवक बुद्ध विहार समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियानाचे पदाधिकारी पद्माकर वहिले, राजाभाऊ मनोहरे,गजानन गवई, ज्योतीताई मेश्राम, प्रतिभा डोंगरे, आधी सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad