पुणे येथे आयोजित केलेल्या 17 वर्षा वयोगटा आतील राज्यस्तरीय रग्बी मॅच मध्ये धामणगाव येथील मुलींनी दुसरा क्रमांक प्राप्त करून धामणगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा रोहला आहे. विद्येचे माहेरघर समजले जाणारे धामणगांव रेल्वे येथे नुकत्याच झालेल्या दहावी व बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय 17 वर्षे वयोगटातील आतील मुला मुलींच्या रग्बी मॅच मध्ये धामणगांवा तील टीमने दुसरे स्थान पटकाविले आहे.
दिनांक 8 व 9 रोजी खेळल्या गेलेल्या राज्यस्तरीय सतरा वर्षा वयोगटा आतील मुला मुलींच्या रग्बी मॅच मध्ये अनेक राज्यातून व शहरातून नागपूर ,मुंबई ,कोल्हापूर, सांगली ,सातारा, यवतमाळ अकोला, पुणे व अनेक अशा शहरातून अनेक रग्बी खेळाडू यांनी भाग घेतला होता.
तेव्हा कोल्हापूर येथील रग्बी खेळाडूंनी प्रथम क्रमांक आणला असून धामणगांवातील रगबी टीम नी दुसरे स्थान प्राप्त करून धामणगाव रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोहला आहे .तेव्हा या सर्व टीमचे व त्यांच्या कोचे व प्रशिक्षकाचे धामणगांव व तालुक्यातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.