सध्या रामगांव येथे संपूर्ण नाल्या बाधणीचे काम करण्यात आले आहे. परंतु नाल्यातील सांड पाणी जाण्यास जागा नाल्या कारणाने तसेच संपूर्ण नाल्या मध्ये कचरा अडकल्या कारणांने सांड पाण्याचा प्रवाह खंडित झाला आहे.
व सांड पाणी नाल्याच्या बाहेरून वाहत आहे. म्हणूनच संपूर्ण ग्राम वासियांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून मोठया प्रमाणात मच्छर तयार झाले आहे व आरोग्याला हानिकारक बाब ठरत आहे.
तरी संपूर्ण ग्राम वासियांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता नाल्याची साफसफाई करण्यात यावी असे निवेदन ग्रामपंचायत व तहसील कार्यालयाला आज दी. ६ जून गुरुवार रोजी अल्पेश बनसोड यांच्या वतीने देण्यात आले, लवकरच नाल्या संपूर्ण साफ केल्या जातील असा वेध घेतला जात आहे.