पाणंद रस्ता कामातील पाणी मुरतेय कुठे? संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी केला सवाल.

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

शासकीय लालफितशाहीच्या धोरणामुळे शासनाच्या ‘शेत तिथे पांदण रस्ता’ या योजनेचा पार फज्जा उडाला आहे. गेल्या वर्षीपासून पावसाने वर्षभरही उसंत न घेतल्याने त्यात तर आणखीनच भर पडली. आता शेतात जायचे कसे, शेतात निघालेले उत्पादन बाजारात न्यायचे कसे, असा फार मोठा यक्षप्रश्न समोर उभा असतो. भातकुली तालुक्यातील पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी त्रास सोसावा लागत असतो. पांदण रस्त्याच्या खडीकरणाची मागणी वारंवार करूनही समस्या सुटली नाही. प्रशासनाने गेल्या मध्यंतर काळात तालुक्यातील विवीध शेताकडे वाटचाल करीत असलेल्या पांदण रस्त्याची मंजुरी दिली. दरम्यान तालुक्यातील जसापूर परिसरातील वडाळा पुर्नवसन ते मोहबाबा मंदिर चौक पांदन रस्त्याचे बांधकामाची मंजुरी मिळाली असता सुमारे २४८८९५०.०० रुपयाचे निर्माण कार्य सा.क्र. ०/०० ते ९३/SDO/२०२३-२४ अनुक्रमिकेनुसार रस्त्याचे बांधकाम दिनांक. ३०.६.२०२३ पुर्ण होणे बंधनकारक असताना अद्यापपर्यंत वाळवंटी भुभागाशिवाय तिथे काहीच बघायला मिळत नाहीं. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारांना केली असता निर्माण कार्य पुर्ण झाल्याची हमी त्यांच्याकडून मिळते. अशातच संपूर्ण गैरप्रकार नितीन कदम यांनी माध्यमांसमोर मांडला. पांदण रस्त्याचा आराखडा तयार झाल्यानंतर पांदण रस्त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम आखल्या गेला नसल्याने पांदण रस्त्याची दशा पालटू शकली नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडिलोपार्जित शेती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेतकरी करतात. तालुक्यातील तसेच गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते उपलब्ध आहेत. परंतू या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी देखील या पांदण रस्त्यांची समस्या निकाली निघू नये, ही खरी शोकांतिका आहे अश्या आशयाची प्रतिक्रिया यावेळी नितीन कदम यांनी दिली.

राजकीय उदासीनता व अधिकारी वर्गाची नव प्रकल्पांची गळचेपी यामुळें ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांची मोठी पंचाईत होत असल्याचे चित्र दिसुन येते.

नितीन कदम

सदर नव निर्माण पांदन रस्त्याचा गैरप्रकार एवढा सोपा नसून यामध्ये आणखी नावे पुढे येऊ शकतात. शासकीय अधिकारी व्यवस्था व यामध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप यासर्व बाबींचा शेतमजूर व शेतकऱ्यांना मोठी जोखीम पत्करावी लागते. म्हणुन याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर योग्य पावले उचलली नाहीत तर सर्व शेतकऱ्यांसोबत संकल्प शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने आंदोलन उभारणार.

राजु वानखडे (स्थानिक शेतकरी)

गेल्या कित्येक वर्षांपासून पांदन रस्त्याअभावी आम्ही जोखीम पत्करून शेतीव्यवसाय करतो. सदर पांदण रस्त्याची दुरवस्था बघता आम्ही नितीन कदम यांना माहिती दिली. त्यांनतर आम्हाला माहिती झाली की हा पांदण रस्ता मंजूर झाला असुन बांधकाम पुर्ण व्हायची तारीख पुर्ण झाली असुन अद्यापही कुठलेच निर्माण कार्य येथे दिसुन येत नाही.

veer nayak

Google Ad