धामणगाव रेल्वे
येथून जवळच असलेल्या वरुड बगाजी येथे श्री समर्थ सदगुरू बगाजी महाराज देवस्थान च्या वतीने श्री समर्थ सद्गुरु बगाजी महाराज समाधी सोहळा निमित्याने रात्री ८ पासून अखंड हरिनाम सप्ताह व सकाळी ९ वाजता पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन ह.भ.प सुभाष महाराज केळीकर (औंढा नागनाथ ),हिंगोली भागवत कथा प्रवक्ते यांच्या सुमधुर वाणीतून आयोजित करण्यात आलेले आहे आहेत.
शुक्रवार दिनांक १० मे २०२४ ते शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे यानिमित्ताने दररोज कीर्तन सेवा राहणार असून शुक्रवारला हभप लक्ष्मण महाराज तराळे कापरा यवतमाळ, जानवी ताई राऊत अमरावती शनिवार यांचे दिनांक ११ मे ला, केशव महाराज चवरे झाडगाव यांचे १२ मे रोजी तसेच १३ तारखेला अक्षय महाराज हरणे ढाकुलगाव १४ मे ला घनश्याम महाराज तायवाडे तर १५ मे रोजी धिरज महाराज तिजारे वरुड बगाजी तर १६ मे ला संदीप महाराज तायवाडे अमदोरी १७ मे शुक्रवारी भास्कर महाराज पिंपळे (तात्या महाराज) चांदुर रेल्वे हे आपली कीर्तन सेवा देणार आहेत याप्रसंगी गायनाचार्य मकरंद महाराज चौधरी भारसवाडा, गणेश महाराज तिखे दाभापूर यवतमाळ, तर मृदंगाचार्य शेखर महाराज मगर परभणी, भारुडकर दिनेश महाराज मगर पापड मारेगाव वर्धा व आदित्य महाराज शिवनगर वर्धा राहणार आहेत या निमित्ताने पहाटे ५ वाजता काकड आरती ६ वाजता विष्णुसहस्त्रनाम साडे सहा वाजता शिवमहिमा स्तोत्र तसेच या निमित्ताने १७ मे २०२४ शुक्रवारला रोजी राजू दगडकर व विपिन दगडकर यांच्या तर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहेत