प्रतिनीधी/अमरावती
सातत्याने दीड वर्षापासून मतदार संघातील कानाकोपऱ्यात पोहोचून शेतकरी व शेतमजूर यांच्या व्यथा जाणून घेतल्या. युवक व शेतकरी वर्गासाठी साठी सकारात्मक काय करता यावे ? व मतदार संघाचा विकास कसं करता येणार या सर्व बाबींचा त्यांनी कसून अभ्यास केला . व मतदार संघाचे विकासाचे मॉडेल सादर केले .
व त्या विकासकामाची सुरुवात म्हणून आज भातकुली तालुक्यातील अंबाळा नाल्यावरील के.टी.वेअर बंधाऱ्याच्या कामाला सुरवात झाली. अशातच बंधारा पूर्ण झाल्यास हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे . अश्या बंधाऱ्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याची चिन्हे आहेत . त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक नितीन कदम यांच्याकडे विकासपुरुष म्हणून बघत आहे. सदर बंधाऱ्याचे काम चालू झाल्याने शेतकरीवर्ग आनंदात झालेला आहे .अनेक दिवसापासून शेतीच्या पिकासाठी पाणी अडवता येत नसल्याने कष्टकरी शेतकरी नाराज होता पावसाळा लागण्याआधी बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन शेतीच्या पिकासाठी पाणी अडवता येईल असेही या परिसरातील शेतकरी वर्ग सांगत आहेत बंधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नितीन कदम ४१ अंश सेल्स. तापमानमध्ये कामाची पाहणी करीत आहेत. दरम्यान विविध बडनेरा विधानसभा भागातली विकासकामांची यादी तयार करून प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम कदम यांची संकल्प शेतकरी संघटना करीत असातांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसुन येत आहे.