धामणगांव रेल्वे :-
तालुक्यातील विटाळा या गावात दि.30एप्रिल च्या सायंकाळी 8वाजताच्या सुमारास गावातील रहिवाशी विजय दत्तात्रय भेंडे यांच्या पत्नी स्वयंपाक तयार करत असताना अचानक घरगुती गॅस सिलेंडर ने पेट घेतला.पेट घेतल्याचे त्वरित विजय भेंडे यांच्या लक्षात आल्यावर लगेंच त्यांच्या पतीच्या लक्षात घटना आणून दिल्याने दोघांनी घराबाहेर पळ काढल्याने होणारी जीवितहानी टळली.
घरगुती गॅस सिलेंडर चा स्फ़ोट एवढा भयानक होता कि घरगुती वापराचे संपूर्ण सामान, टीव्ही, दिवाण, कपाट, महत्वाचे कागदपत्रे, व अन्य सर्व सामुग्री जळून राख झाल्याचे पाहायला मिळत आहे. सिलेंडर स्फ़ोटमुळे घरावरील टिन पत्रे सुद्धा उठून निघाले.घटनेची माहिती मंगरूळ दस्त पोलिसांना मिळताच ठाणेदार इंगळे साहेब आपल्या कर्मचाऱ्यांन समवेत घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास चालू आहे.