प्रतिनिधी
अमरावती लोकसभा निवडणूक मध्ये संपूर्ण जिल्हाभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी वृंद व पोलीस अमलदार यांच्या खांद्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रशासनाच्या वतीने सोपविण्यात आली अतिशय नियोजनबद्ध हा निवडणूक कार्यक्रम संपन्न झाला या निवडणूक प्रक्रियेत शिक्षक, पंचायत समिती, तहसील, नगरपरिषद ,एसडीओ कार्यालय, पोलीस प्रशासन,मधील बांधव कार्यरत होते.
विविध संस्थांचे कर्मचारी वृंद यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले तापत्या उन्हात कर्मचाऱ्यांनी एक-दोन दिवस संसार सोडून लोकशाहीचा उत्सव पूर्णत्वाकडे नेला तर दर्यापूर मध्ये सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांनी कुठलीही हय गय न करता निवडणूक कार्यक्रम नियोजनबद्ध केला तर दर्यापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संतोष ताले यांनी दिवस रात्र एक करत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही त्यांच्या सहकार्याला पोलीस अंमलदार यांनी सुद्धा मेहनत घेत दर्यापूर मध्ये अपरिहार्य घटना घडू दिल्या नाही हे तितके महत्त्वाचे भर उन्हात खाकी रस्त्यावर होती यामध्ये पुरुष व महिला ह्या सुद्धा खडा पहारा देत होत्या संपूर्ण महाराष्ट्रातून सैन्यदल हे दर्यापूर मध्ये दाखल झाले होते दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली त्यांची संपूर्ण व्यवस्था ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ठाणेदार संतोष ताले यांनी केली तर ठाणेदार यांच्यावर सर्व स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत असताना दिसत आहे