लाेकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी 2 वर्षिय चिमुकल्याचे मतदारांना आवाहन

0
206
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी-

दर्यापुर सांगळुदकर नगर येथील प्रा. कमलकिशाेर खेतान यांचा नातु एकांश मयूर खेतान हा येणा-या लाेकसभा निवडणुकीत लाेकशाही मजबुत करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन करत आहे.

सविस्तर वृत्त असे की एकांश हा 2 वर्षाचा असुन अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धिचा आहे. त्याची माेठी आजी श्रीमती विमल खेतान हि 85 वर्षाची आहे. त्याची आजी दिव्यांग असुन तिने घरुनच लाेकसभा निवडणुकीत मतदान केले त्यामुळे तिच्या बाेटाला एकांशला शाई दिसली. ताे वारंवार ति बाेटाची शाई बघत हाेता. त्याला वाटले हि शाई कशाची आहे.म्हणुन त्याच्या आजाेबाने त्याला काही मतदान विषयक पाेस्टर्स दाखविले.व समजावुन सांगितले. ताे आग्रह करत हाेता की हि शाई माझ्या सुध्दा बाेटाला लावा.

शेवटी त्याला मतदान करण्याविषयीचे पाेस्टर बनवुन दिल्यावर ताे खुश झाला.

ताे या पाेस्टर च्या माध्यमातुन सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे.

त्याच्या या उपक्रमाचे सर्व सांगळुदकर वासी भरभरुन काैतुक करत आहेत.

veer nayak

Google Ad