जिल्हा काँग्रेस कार्यालय व राष्ट्रवादीचे कार्यालय असंचालित असून डॉ. शिरीष गोडे यांच्या निवास स्थानावरून राष्ट्रवादीच्या घडामोडी सुरु आहेत. प्रचाराची माहिती देण्यास व नियोजनासाठी सर्व कार्यकर्ते व नेते याचठिकाणी एकत्रित येतात. याचठिकाणी रात्री १०:३० वाजता प्रचारावरून आलेले गुरुराज राऊत हे देखील इतर सहकाऱ्यांसह आले. गुरुराज राऊत हे मेघा पाटकर यांच्यासह संविधान सन्मान यात्रेत २५००० किमीचा प्रवास केलेले आणि सात राज्यात भारत जोडो न्याय यात्रेत राहुलजींचे यात्री आणि एल एल एम चे पदवीयुत्तर शिक्षण पूर्ण केलेले वकील आहेत.
ते शिरीष गोडे यांचेकडील उमेदवाराच्या कार्यालयात गेले असता त्यांना उमेदवाराचे मामा अनिल देशमुख यांनी नियोजनाची चर्चा सुरु असतांनाच एकेरीत दटावणे सुरु केले. “तु कोणासमोर उभा आहेस माहिती आहे काय? माझ्या समक्ष बसलास कसा? तुझी देहबोली अतिशय आदराची आणि झुकलेली एका मोठ्या माणसा समक्ष कशी असायला पाहिजे? शिक आधी”. यावेळी घटनेचे मुकदर्शक साक्षदार म्हणून याठिकाणी वैभव तुमाने, प्रमोद भोमले, नितेश कराळे, अविनाश काकडे, नितीन झाडे व मित्र पक्षांतील इतर सहकारी उपस्थित होते. या अपमानाने ऍड गुरुराज अत्यंत दुखावल्या गेले व आम्ही सहकारी आहोत स्वतःच्या वाहनाने व पैशाने पक्षाच्या विचारांशी बांधिलकी आहे म्हणून प्रचार करतो, आम्हाला सालदारा पेक्षाही खालची वागणूक का? इतका खोटा गर्व तुम्हाला कशाचा? अश्या आशयाचे संदेश खुद्द अनिल देशमुखांना केले आणि जाब विचारला.
त्यावर अनिल देशमुखांनी मगरूरी दाखवत हिणवले म्हणून ऍड गुरुराज यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे ई मेल द्वारे व व्हाट्स अप द्वारे त्यांनी याविषयी ” माझं असं काय चुकलं की एक तुरुंगातून आलेला आरोपी माझ्या सारख्या उच्च शिक्षित वकिलाला अपमाणित करण्याचं धाडस करतो?” अश्या प्रश्नाच्या आशयाची तक्रार केली आहे. यावर काँग्रेसच्या एका राष्ट्रीय नेत्याने ही हेखेखोरी व माज वर्षानुवर्षे सत्तेत असल्याने आला असल्याचे सांगितले व लोकांनीच घराणेशाहीला जोऱ्याने उपटून फेकावं की पुन्हा पक्षांनीही यांना उभे करण्याच्या आधी शंभर वेळा विचार करण्याची वेळ यावी असे बजावले. यांच्या या दुर्व्यव्हाराने अनेक लोकं दुखावले असल्याची तक्रार करणार असून सहकारी पक्षाला सन्मानाने वागण्याचा सल्ला देण्याची मागणी वरिष्ठांकडे पोहोचवणार असल्याचे त्यांनी गुरुराज यांना कळविले आहे.