अमरावती दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
सामान्य निवडणूक निरीक्षक सि.जी रजनीकांथान, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसिलदार निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.