शेतकरी व आम जनतेनी फिरवली पाठ गांधी चौक शास्त्री चौकापर्यंत मार्केट लाईन येथील व्यापाऱ्यांच्या सदिच्छा भेटी करता रामदासजी तळस यांनी पदयात्रेचे आयोजन केले होते.
परंतु पदयात्रा निघाल्यावर पदयात्रेत 10 ते 15 ठेकेदाराच्या शिवाय कोणीही उपस्थित नसल्याने संपूर्ण धामणगाव शहरात तडस यांनी मागील दहा वर्षात कुठलीच सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध केले नाही मोठे कामे केली नसल्याने गावातील नागरिकांची नाराजी असल्याचे दिसून आले. खासदार यांनी जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्याकरीता लोक आपला प्रतिनिधी निवडतात परंतु जनतेचे प्रश्न न मांडता फक्त निवडणुका आल्या की लोकांना घेऊन पदयात्रा काढणे व लोकांची मत घेऊन निवडून येणे व विकास कामातून कमिशन घेऊन स्वतःचे घर भरणे हा सर्रास धंदा मतदार संघात सुरू आहे. आता जनता सुद्धा हुशार झालेली आहे. कमिशनखोर नेत्यांना हद्दपार करण्याकरीता जनतेने सुद्धा कंबर कसल्याचे दिसून येते.