अंजनगाव लोकसभा निवडणुक मतदारसंघात 342 मतदान केंद्र

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दर्यापूर – दिव्यांग आणि ज्येष्ठांना पोस्टल मतदान करण्याची आयोगाकडून सवलत अनंत बोबडे. होऊ घातलेल्या लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2 लाख 99 हजार 620 मतदार असून त्यात 342 मतदान केंद्राची व्यवस्था निर्मिती करण्यात आली आहे.भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, असून 26 एप्रील रोजी मतदान होणार आहे.मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली, असल्याची माहीती सहाय्यक निवडणूक अधीकारी तथा एसडीओ राजेशवर हाडे यांनी दिली.

दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन लाख नव्यांनऊ हजार सहाशे वीस मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 55 हजार 128 पुरुष, 1 लाख 44 हजार 489 महिला तर 3 तृतीयपंथी मतदार आहेत.यासाठी एकूण 342 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. दर्यापूर तालुक्यात 170 तर अंजनगाव तालुक्यात 140 तर अचलपूर भागात 32 मतदान केंद्र असणार आहेत. दर्यापूर-अंजनगाव मतदारसंघात निवडणूक अधिकारी, मतदान केंद्रप्रमुख, सहायक अधिकारीसह 1 हजार 572 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक शांततेत, सुरळीत होण्यासाठी निवडणूक विभागाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. यंदाच्या होत असलेल्या लोकसभेच्या मतदारांच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या गैरसोयी-सुविधाकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. शिवाय दिव्यांग व दुर्धर आजारग्रस्त जेष्ठांना 12 डी हा अर्जं भरुन पोस्टल मतदान करण्याची सवलत देण्यात आली असल्यामुळे ज्येष्ठांना व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, घरी बसूनच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान 4 एप्रील रोजी अंतिम मतदार यादी प्रसीद्ध करण्यात येईल अशी माहिती तहसील प्रशासनकडून देण्यात आली.

तहसीलदार डॉ.रवींद्रकुमार कानडजे,निवडणूक नायब तहसीलदार शेषराव लंगडे,नायब तहसीलदार मनोज सोनारकर,नायब तहसीलदार प्रवणी जमदाडे,नायब तहसीलदार प्रमोद काळे,नायब तहसीलदार अनिल नाडेकर याच्यांसह महसूल कर्मचारी कार्यालयीन जबाबदारी साभाळत आहेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांनी सुद्धा गस्त वाढविली आहे,

veer nayak

Google Ad