#आरल ही ने वाचविले चिमुकल्या मुलीचे प्राण. स्विमिंग पूल जवळ खेळताना घडली घटना 

0
318
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल/ चांदूर रेल्वे येथील रहिवासी संतोष सोळंके हे पुणे येथे असलेल्या इंद्रधनुष्य ग्रेस सोसायटी मध्ये राहतात या सोसायटीच्या आवारात असलेल्या स्मीमिग पूल जवळ श्रीशा नावाची 3 वर्षाची चिमुकली आजी सोबत खेळता खेळता स्मीमिग पूल च्या पायर्‍यावरुन खाली वर करत असताना पाण्यात पाय घसरून पडली ती पाण्यात बुडत असताना सोसायटी मधील एका महिलेने ने वाचवा वाचवा असी आरडा ओरडा केली ही बाब व आवाज 11 वर्षाची आरल च्या कानांवर पडताच तीने क्षणाचाही विलंब न करता स्मीमिग पूलकडे धाव घेत पाण्यात उडी घेतली व लगेच चिमुकली श्रीशा चा हात धरून स्मीमिग पूल च्या बाहेर काढून तीला पोटावर उलटे झोपून पोटातील पाणी काढत तीचे प्राण वाचविले तीच्या ह्या कामगीरी बद्दल उपस्थित लोकांनी आरलचे कौतुक करत अभिनंदन केले तीच्या ह्या धाडसी कार्याने श्रीशा मुसळेच्या परिवारातील लोकांनी आरल च्या आई वडलाचे आभार व्यक्त केले असे म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी श्रीशा ह्ची वेळतच आरल ने मदत केली नसती तर मोठा अनर्थ झाला असता तीच्या हिम्मतीने हा प्रकार टळला खरच मुलींमध्ये इतके धाडस असने ही काळाची गरज आहे .

veer nayak

Google Ad