# मुलींच्या लग्न सोहळ्यात मतदान जनजागृती. # सहाय्यक गट विकास अधिकारी यांची संकल्पना. # वर्‍हाडी व पाहुण्यांना दिली शपथ 

0
170
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे /

 चांदूर रेल्वे पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय खारकर व नोडल अधिकारी घोडगे यांच्या संकल्पनेतून मतदान जनजागृती करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी कुठल्याही संधी सोडत नसल्याचे चित्र या लोकसभेच्या निवडणूकीच्या दरम्यान दिसत असून, सोमवारी ता ,01/04/2024 रोजी चांदूर रेल्वे पंचायत समितीचे मा, गट शिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर यांच्या मुलीच्या लग्नात उपस्थित वऱ्हाडी व पाहुण्यांना निवडणुकीत मतदानाचे महत्व समजावून सांगत मतदान करण्याची शपथ देण्यात आली.

 आगामी लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील व मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढवावी ,म्हणून प्रशासनाचे कर्तव्यदक्ष अधिकारी कुठल्याही संधी सोडत नसल्याचे चित्र सध्या दिसतं आहे , 1 एप्रिल ला पंचायत समितीचे मा शिक्षणाधिकारी मुरलीधरन राजनेकर यांच्या मुलीचे लग्न सोहळा चांदूर रेल्वे येथिल यंशवत मंगल कार्यालयात पार पडला, या लग्नसोहळात उपस्थित वऱ्हाडी व पाहुण्यांची गर्दी पाहत 

चांदूर रेल्वे पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी संजय खारकर व नोडल अधिकारी घोडगे यांच्या संकल्पनेतून मतदान जागृती करत, मतदानाचे महत्त्व लग्न सोहळ्यात उपस्थित जनतेला सांगत मतदान शपथ देण्यात आली, यावेळी संजय खारकर यांचे सह गट शिक्षणाधिकारी संदीप बोडके, मतदान जनजागृती जिल्हा कक्षाचे सदस्य ज्ञानेश्वर घाटे, तालुका कक्षाचे सदस्य गजेन्द्र पाटील,सचिन वावरकर,प्रशांत धर्माळे, राहूल गवई हे उपास्थित होते.

veer nayak

Google Ad