चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रचे आदि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 28 मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जिंगल बेल शाळेचे संस्थापक दिपक डाहाने यांच्या हस्ते पुजन व महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
स्थानीय शिवाजी नगर शिव उत्सव समिती व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राजे छत्रपति शिवाजी महाराजांची तिथी अनुसार जयंती 28 मार्च ला भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले जंगल बेल शाळेत महाराजांचे गड किल्ले या विषयावर निबंध स्पर्धा व रेल्वे स्टेशन परिसरातील गरीबांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले तर सायंकाळी शिवाजी नगर मधून वाजत गाजत भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली शहरात राजे संभाजी चौक व स्व बाळासाहेब ठाकरे चौकात शोभायात्रेचे स्वगत करण्यात आले तर राम मंदिर येथे शोभायात्रची सांगता करण्यात आली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश पांडे,तालुका अध्यक्ष संजय चौधरी,राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष गणेश राॅय,शहर अध्यक्ष गजानन यादव उप तालुका किशोर यादव संदीप जरे, माजी तालुका प्रमुख बंडू यादव, विजय मिसाळ,संतोष जगताप, माजी तालुका प्रमुख त्रिलोक मानकानी,जगदीश माहुलकर किशोर घोरपडे, सुरेश यादव, पप्पु माने, सागर गरूड, वामण बाबर, संकेत यादव,आदित्य डोंगरे, अंकित कदम,सौरभ यादव,अजय हजारे,केशव वंजारी, नागपूर संदीप हजारे तर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.