शहरात वराह मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढ नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरात सर्वत्र दुर्गंधी

0
43
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी-गौरव टोळे

दर्यापूर शहरात गेल्या कित्येक दिवसापासून पाण्याच्या डबक्यात वराह मृत्यू होण्याची संख्या अधिक झाली आहे मृत्यू झालेल्या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे वराह हे दिवसभर पाणी साचलेल्या ठिकाणी आधार घेऊन बसले असतात हा वाराहांना झालेला नेमका आजार कोणता हे अद्याप निश्चित झाले नाही वराह आपला जीव त्या पाण्यातच गमावत आहेत शहरात ठिकठिकाणी पाणी साचलेल्या भागात वराह मृत्यूंची संख्या अधिक झाली तर वराह हे किळसवाणे दिसत असून त्याच्यावर असलेले रोगजंतू हे हवेत प्रसारित होत आहे अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाने व आरोग्य विभागाने तात्काळ वराहानचा बंदोबस्त करावा असे जनमानसात बोलले जात आहे

➖➖➖➖➖➖➖➖

दर्यापूर शहरात विविध ठिकाणी पाणी साचले आहेत व नाल्या सुद्धा तुडुंब भरल्या आहेत यामध्ये गायत्री नगर पंजाबराव कॉलनी साईनगर रेल्वे गेट परिसरात वराह मृत्यूंची संख्या अधिक आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे पालिका प्रशासनाने यावर ताबडतोब योग्य ती कारवाई करावी

➖➖➖➖➖➖➖➖

आतिष शिरभाते शहर अध्यक्ष काँग्रेस दर्यापूर

➖➖➖➖➖➖➖➖

veer nayak

Google Ad