शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात जलदिन संपन्न पाणी संवर्धन व संरक्षण सर्वांचे सांघीक कार्य – प्रा. गजानन भारसाकळे 

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अकोला: अनियमित तथा अपुरेसा पावसाळा , पृथ्वीच्या आतील पाण्याची दिवसेंदिवस कमी होत चाललेली पाण्याची पातळी तसेच विकास दिशेसाठी जंगलातील जमीन अधिग्रहण प्रक्रीया अंतर्गत वृक्ष तोडीचे वाढते प्रमाण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून येणाऱ्या पिढ्यांच्या संरक्षणार्थ

या अल्प जल संकटाचा नियोजन पूर्ण सामना करणे हे आपल्या सर्वांचे सांघीक कर्तव्य आहे असे सूचक विधान प्रा. गजानन भारसाकळे यांनी जागतिक जल दिन निमित्याने आयोजित समारंभात कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते या नात्याने केले . स्थानिक बाभूळगांव-अकोला येथील शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत थोरात यांनी वृक्षारोपण , पाणी संवर्धन व संरक्षण ही काळाजी गरज असल्याने विद्यार्थ्यांनी समाजामध्ये या बाबत विशेष जलजागृतीचे कार्य करणे गरजेचे असल्याचे भावनिक आवाहन केले .

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार प्राप्त असलेल्या प्रा. भारसाकळे यांनी आपल्या साध्या सोप्या भाषेत जीवनाला आवश्यक पाणी या घटकासाठी घ्यावयाची काळजी व नियोजन या बाबतीत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून येणाऱ्या काळातील जल संकट निवारण यासाठी मार्मिक संवाद साधला . पाणी क्षेत्रात देशात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आयवा या संघटनेची अकोला शाखा व महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरींग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ अभिनंदन गुप्ता यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तथा प्रा. दुश्यन झामरे यांच्या प्रमुख नियोजनात संपन्न झालेल्या या जागतिक जल दिवस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. काशी देवा , प्रास्ताविक डॉ अभिनंदन गुप्ता तथा आभार प्रदर्शन कु साक्षी धनबर यांनी केले . कार्यक्रमा दरम्यान विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा तसेच जल या विषयाअंतर्गत फोटो चित्र स्पर्धा ही घेण्यात आली . स्पर्धेच्या परीक्षक चमूमध्ये प्रा. आर. एम. फुके , प्रा पी एम राऊत , प्रा. अमित गावंडे , प्रा. आदित्य गणगणे व प्रा. वैशाली वानखडे या प्राध्यापक वर्गाचा समावेश होता. कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजन प्रक्रियेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुलदीप खंडारे , भूषण कमलाकर , काशी देवा , भावेश बनीया , कल्पेश बगेले , तेजस वाघ , साक्षी सुर्यवंशी यांचे सह द्वितीय , तृतीय व चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांनी योगदान व सहकार्य दिले . संपूर्ण कार्यक्रम हा महाविद्यालयातील संगणक विभागा अंतर्गत प्रा. डॉ . मंदार देशमुख व त्यांची सहयोगी चमू यांच्या सहकार्याने ऑन लाईन प्रसारित करण्यात आल्याने या कार्यक्रमाचा सर्वांना लाभ मिळाला . कार्यक्रमस्थळी तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थीनी यांनी पर्यावरण विषयावर साकारलेली रांगोळी कार्यक्रमाचे आकर्षण ठरली .

veer nayak

Google Ad