अखेर शिवर येथील सरपंच व लाभार्थी यांच्या मागणीला यश साठ टक्के लाभार्थ्यांच्या खात्यात क्षणात पैसे जमा तर उर्वरित लाभार्थ्यांना पंधरा दिवसात मिळणार लाभ नितीन देशमुख यांचे शर्तीचे प्रयत्न सफल

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी-गौरव टोळे

गेल्या कित्येक वर्षापासून शिवर येथील घरकुल लाभार्थ्यांचे भिजत घोंगडे हे पळून होते. शिवर येथील शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बापू देशमुख व सरपंच यांनी अनेक निवेदने पंचायत समिती प्रशासनाला दिली होती परंतु त्यावरील कारवाईला गती प्राप्त होत नव्हती त्याअनुषंगाने घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी शिवर येथील सरपंच व लाभार्ती नितीन देशमुख यांनी .

प्रशासनाच्या विरोधात एक आठवडा पूर्वी .विविध वृत्तांच्या माध्यमातून अल्टिमेटम दिला होता. आज गुरुवार रोजी शिवर येथील सरपंच व ग्रामस्थ यांनी थेट दर्यापूर पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली होती. विविध समाजातील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे टप्पे देण्यासाठी. विनाकारण विलंब होत होता .आज शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी व सरपंच यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी यांना घेरा घातला होता यामध्ये आज शिवर येथील तब्बल 60 टक्के घरकुल लाभार्थ्यांना क्षणातचं घरकुलाचा आर्थिक लाभ मिळाला. तर उर्वरित लाभार्थ्यांना पंधरा दिवसाच्या आत टप्पा अदा करण्याचे लिखित स्वरूपाचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी लाभार्थ्यांना आश्वासित केले .शिवर येथील घरकुल लाभार्थ्यांनी व शिवर येथील सरपंच यांनी उभारलेल्या लढ्याला यश प्राप्त झाल्याने नितीन बाप्पू देशमुख, लाभार्थी, व सरपंच, यांनी प्रशासनाचे आभार मानले उर्वरित लाभार्थ्यांना पंधरा दिवसापर्यंत लाभ देणार असल्याचे सुद्धा व्यक्त करण्यात आले

veer nayak

Google Ad