प्रतिनिधि / अमरावती :
शेतकऱ्यांच्या विविध समस्या व अन्यायाविरोधात लढा देणारी ‘संकल्प शेतकरी संघटना’ नितीन कदम यांच्या नेतृत्वात नेहमीच कार्यरत असते.शेतकऱ्यांच्या प्रश्नासानदर्भात थेट विधीमंडळात पोहोचून मुख्यमंत्र्यांना घेराव घालत ही संघटना महाराष्ट्रात मुख्य: विदर्भात चर्चेत आली. याच संघटनेची गेल्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली असतांना तालुकास्तरीय मुख्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली.भातकुली तालुका अध्यक्ष परेश मोहोड व भातकुली शहर अध्यक्ष प्रफुल महल्ले यांच्या आयोजनात व नितीन कदम यांच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक पार पडली. शेकोडो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत गठित केलेल्या कार्यकारणीला एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेच्या वतीने शेतकरी समस्या , उपाययोजना , नवतंत्रज्ञान अत्याधुनिक सांसाधणे ,परिसरातील शैक्षणिक गुणवत्ता , स्वच्छता ,आरोग्य , रोजगार , सामाजिक ऐक्य , राष्ट्रीय एकात्मता , सामाजिक सलोखा यावर विस्तृत चर्चा करण्यात आली .
या तालुका स्तरीय नियोजन बैठकीत शहर अध्यक्ष प्रफुल महल्ले , शहर उपाध्यक्ष दीपक भोपसे ,सचिवपदी आकाश रायबोले,कोषाध्यक्ष वासुदेव तिडके,सहसचिव संदीप बांबल,सदस्य सुधीर रेहपाडे ,सदस्य प्रवीण होले,सदस्य संजय पवार,सदस्य सुधीर डाखोंडे,सदस्य योगेश वर्हेकर,सदस्य बंसी लाठी ,बूथ प्रमुख गजानन सवाई,सदस्य जीवन वाघमारे, सदस्य ऋतिक चेके, सोशल मीडिया प्रमुख आकाश राऊत ,सदस्य किशोर घोंगळे, यांच्यासोबतच भातकुली तालुका अध्यक्ष परेश मोहोड,उपाध्यक्ष रोशन सणके,उपाध्यक्ष उमेश मानकर,सचिव सतीश पवार ,कोषाध्यक्ष सोपान भटकर,सहसचिव स्वप्नील शेरोडे,सदस्य सुशील चोरपगर,सदस्य आकाश मानकर,सदस्य नवल घुरडे,सदस्य सागर सवाई,सदस्य भूषण बहाडे इत्यादींना नियुक्तिपत्रे वितरित करण्यात आली. यावेळी भातकुली तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते …