चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
महाविद्यालय, संस्थेतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर गावपातळीवर राबविण्यात येते. ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, रूढी-परंपरा अनुभवण्यासाठी हे शिबिर उपयोगी ठरतात. विविध परिस्थिती जुळवून घेण्याची कला या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत असते या दृष्टीने जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. याचाच भाग म्हणुन चांदूर रेल्वे आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी राजना गावात साफसफाई अभियान राबवित तांत्रिक शिक्षण प्राप्त करीत असल्यामुळे गावकऱ्यांची तांत्रिक कामे सुध्दा करून दिली.
११ ते १७ मार्च दरम्यान पार पडलेल्या या शिबिरात ११ मार्च रोजी सकाळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वे परिसरात स्वच्छता करण्यात आली. यानंतर व्यसनमुक्ती समुपदेशन व रोजगार मार्गदर्शन प्रभारी प्राचार्य धनंजय भोगे यांनी केले. तर शिबीरातील प्रशिक्षणार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. आशिष घुरडे यांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर श्रीकांत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तर दररोज योगाचे धडे योग प्रशिक्षक शरद बेहरे यांनी दिले. १२ मार्च रोजी आयटीआय मधील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली, यानंतर स्वच्छता ही सेवा मार्गदर्शन लीलाधर दांदडे यांनी तर अंकगणित मार्गदर्शन प्रवीण पुंड यांनी केले. १३ मार्च रोजी सर्व शिबिरार्थी राजना या गावी पोहोचले. यावेळी शिबिराचे उद्घाटन सरपंच धनंजय गावंडे यांच्या हस्ते पार पडले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य दिनेश बोबडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्राचार्य धनंजय भोगे, उपसरपंच सुरेखा जळीतकर, ग्रामसेवक ललिता राऊत, सदस्य गजानन गावंडे, सुरेश गौरकार, राहुल गोसावी, सोनाली भोंडे, संध्या गावंडे, कोमल भगत आदींची उपस्थिती होती. १४ मार्च रोजी सकाळी प्रकल्प श्रमदान व तांत्रिक कामे करण्यात आली. यानंतर संत गाडगेबाबा यांचे जीवन कार्य यावर अविनाश देवतारे यांनी तर सामाजिक कार्याबद्दल मार्गदर्शन प्रशांत पाचपोर यांनी केले. १५ मार्च रोजी खेळ व व्यायामाचे जीवनात महत्त्व यावर कैलास चौधरी यांनी तर मोबाईल वापरण्याचे फायदे व तोटे यावर विनोद रेवस्कर यांनी व तांत्रिक शिक्षणाचे फायदे यावर प्रफुल्ल गावड यांनी मार्गदर्शन केले. १६ मार्च रोजी ध्यान व योगाचे महत्त्व यावर प्रकाश ठाकरे यांनी तर व्यक्तिमत्व विकास यावर अनिल खडसे यांनी मार्गदर्शन केले. शेवटच्या दिवशी १७ मार्च रोजी ग्राम स्वच्छता अभियान राबवून जनजागृती रॅली काढण्यात आली. समारोपीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच धनंजय गावंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दिनेश बोबडे, पोलीस पाटील राजेंद्र कोहरे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप गावंडे, सुनील गावंडे, बबन गावंडे, देवानंद वाघमारे यांची उपस्थिती होती. शेवटी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन एस. आर. भांडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृह उपलब्ध करून देण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. राजनामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी पेंटींग, वेल्डींग, इलेक्ट्रीशियन आदी तांत्रिक कामे सुध्दा केली. सदर शिबीराच्या यशस्वीतेकरिता रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रमोद वारकड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संजय गुल्हाणे, आयटीआयचे शिल्पनिदेशक प्रफुल्ल गावड, अनिल खडसे, प्रशांत पाचपोर, श्रीकांत ठाकरे, विनोद रेवस्कर, लिलाधर दांदडे, प्रकाश ठाकरे, ऋतिक सावदे, अविनाश देवतारे, कैलास चौधरी, गजानन भडांगे, प्रशांत टांगले, शरद बेहरे, सुरज चांदूरकर, सुधाकर कांबळे, जयश्री रंगारी, कर्मचारी प्रविण पुंड, नंदा आत्राम, तेजस इमले, जी. एच. राठोड, रामु कनोजे, एस.पी. रामटेके तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. याकरिता ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंंच, सचिव, सदस्य व गावकऱ्यांनी सहकार्य केले. संपुर्ण शिबीराचे सुत्रसंचलन प्रमोद वारकड व आभार प्रदर्शन संजय गुल्हाणे यांनी केले.