प्रतिनिधी
स्थानिक अमरावती येथील रहाटगाव येथे राहत असलेली नेहा मारोतराव वानखडे हिने श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथून पदव्युत्तर शिक्षण घेत तिने दिवस रात्र अभ्यास करीत कृषी सेवक सरळ सेवा भरती 2023 मध्ये कॅटेगिरी मधून प्रथम क्रमांक पटकावला यासह तिची कृषी सेवक म्हणून अमरावती विभागात निवड सुद्धा करण्यात आली कृषी सेवक पदी निवड झाल्याबद्दल वैदर्भीय नात समाज संघटनेचे विदर्भ प्रमुख दिवाकरनाथ गोरकर व कल्पना दिवाकर गोरकर यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या