धामणगाव रेल्वे
संस्कारापासून माणूस दुरावला, संत परंपरेचा विसर पडला. भूगोलाच्या मागे लागून इतिहास विसरला. त्यासाठी कीर्तनाची आवश्यकता आहे. अध्यात्माचं अध्ययन करण्याची गरज आहे. महत्त्वाचं म्हणजे या बिघडलेल्या, विस्कटलेल्या घडीला सुस्थितीत आणायचं असेल तर त्यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणं ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ह भ प अनिल महाराज साखरे यांनी कीर्तनात तिसरे पुष्प सादर करताना बोलत होते
जळगाव आर्वी येथील संत लहरी बाबा पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान अमृतबोध देताना ते ह भ प अनिल महाराज साखरे म्हणाले की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पाषाणयुग ते आधुनिक संगणक, युगापर्यंत मानवाने प्रगती केली आहे. वैचारिक शक्ती वाढली आहे. पण विवेकाचं काय, घरं अद्ययावत झाली आहे, पण घरपणाचं काय ? माणसं वाढली आहे, माणुसकीचं काय? प्रश्न, प्रश्न, आणि फक्त प्रश्न उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारी माणसंच जणू हरविली आहे. अध्यात्म व कीर्तनाचा मार्गच माणूसपण शिकवु शकते असेही ते म्हणाले