जिल्हास्तरीय तृतीयपंथी कल्याण समितीमार्फत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते तृतीयपंथीयांना उद्योगासाठी पाठबळ देत त्यांना झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, शिलाई टूल किटचे वितरण करण्यात आले.
तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उद्योगासाठी पाठबळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण माया केदार, समाज कल्याण निरीक्षक प्राजक्ता सोनूने आदी उपस्थित होते.