प्रतिनिधी-गौरव टोळे
दर्यापूर शहरातील सर्वगुणसंपन्न व्यक्ती मधून एक असलेले ऍड निशिकांत मोहनकुमार पाखरे यांची नुकतीच भारत सरकारच्या नोटरी पदी निवड झाली असून त्यांना रीतसर त्याचे नाव प्रसिद्ध सुद्धा करण्यात आले ऍड निशिकांत पाखरे हे आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक असून त्यांनी अनेक पक्षकारांना न्याय मिळवून दिला व पक्षकार सुद्धा त्याच्यावर डोळेबंद विश्वास करतात ही त्यांची दर्यापूर न्यायालयात ओळख बनली आहे त्यांना भारत सरकारची नोटरी मिळाल्याने सर्व स्तरावरून ऍड पाखरे याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे