पोदार शाळेची राज्यस्तरावर उत्तुंग भरारी

0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड शाळेला बेस्ट स्कूल अवार्ड
डॉ. होमी बाबा फाउंडेशन मुंबई द्वारा पोदार इंटरनॅशनल स्कूल अमरावतीला विदर्भ विभागामध्ये बेस्ट स्कूल अवार्ड प्रदान केल्या गेला. हा अवॉर्ड स्कूल लीडरशिप, इन्स्पिरेशनल व्हॅल्यू तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रदान केला गेला.

यासोबतच ‘जनरल रीजनिंग अँड अटीट्यूड टेस्ट’ (ग्रेट) परीक्षेमध्ये पोदार शाळेचा आरुष तायडे (वर्ग पाचवी) याने राज्यस्तरावर प्रथम स्थान तसेच विराज चांदुरकर (वर्ग सहावी) याने द्वितीय स्थान प्राप्त केले. यासोबतच वर्ग नववीची विद्यार्थिनी जिज्ञासा करे हिने ‘मॅथेमॅटिक्स अँड सायन्स अबिलिटी टेस्ट’ परीक्षेमध्ये राज्यस्तरावर द्वितीय स्थान प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, प्रमाणपत्र तसेच गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

यासोबतच या तीन विद्यार्थ्यांची डॉ. होमीभाभा फाउंडेशन द्वारा ‘इसरो विजिट’ साठी निवड केली गेली. या सन्मान समारंभामध्ये डॉ. होमी भाभा फाउंडेशन मुंबई च्या डायरेक्टर डॉ. अस्मा फातेमा तसेच श्री. सुनील कुलकर्णी उपस्थित होते. प्राचार्य सुधीर महाजन द्वारा या राज्यस्तराच्या यशासाठी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. बेस्ट कूल अवार्डसाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांद्वारे शाळेची भरपूर प्रशंसा केली गेली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य सुधीर महाजन यांच्या नेतृत्वामध्ये उपप्राचार्यI अर्चना देशपांडे, मीनाक्षी मिश्रा डॉ. आशिष खुळे, विजेता वानखेडे डॉ. आशिष भेटाळू. शक्तीस्वरूप गुप्ता, हरीश लड्डा, संदीप ठाकूर द्वारे विशेष प्रयत्न केले गेले.

veer nayak

Google Ad