अंजनसिंगी येथे जागतिक महिला दिन संपन्न

0
43
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आठ मार्च जागतिक महिला दिन,व दहा मार्च सावित्रीबाई फुले पुण्यतिथी त्यांचे औचित्य साधून दिनांक 12 मार्चला येथील कान्होजी बाबा सभागृहामध्ये स्त्री शक्ती ग्राम संघ, आदिशक्ती ग्राम संघाच्या संयुक्त रित्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा येथील पोलीस पाटील सौ अर्चना रा. धवणे, प्रमुख मार्गदर्शन म्हणून दत्तापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये स्त्रियांचे हक्क त्यांची अंमलबजावणी कशी करावी यांना कायद्यास संरक्षण कशा प्रकारे दिले जाते असे विविध महिला विषयी माहिती त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केली या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख अतिथी म्हणून उमेश आगरकर वॉटर डॉट ओ आर डी चे कॉर्डिनेटर यांनी महिलांना व्यवसाय कसे करावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले धामणगाव पंचायत समितीचे व्यवस्थापक कक्षाचे संदीप गजभिये सर यांनी उमेद अभियान विषयी मार्गदर्शन केले.श्री विवेक महागावकर क्लस्टर कॉर्डिनेटर, पुनम म्हात्रे सीटीसी , दिनेश शिरभाते अध्यक्ष कान्होजी बाबा मंदिर त्यांच्याय प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे संचालन माधुरी मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक पपीता मनोहरे अध्यक्ष स्त्री शक्ती ग्राम संघ यांनी केले आभार प्रदर्शन शिल्पा तालन यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती बांगडे, सरिता बंड, विजया मोहनकर, रेखा बिजवे, हर्षाली पारखंडे, संध्या ठाकरे, उर्मिला झाडे, प्रज्ञा पारखंडे ,ललिता झाडे, वैशाली वाळके, तसेच गावातील संपूर्ण बचत गटाच्या महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या

veer nayak

Google Ad