धामणगावात जिल्हास्तरीय भक्ती शक्ती संगम सोहळा* श्रीराम कथा वारकरी अधिवेशन अखंड नामसंकीर्तन सप्ताह

0
27
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे:-

महाराष्ट्र वारकरी महामंडळ तालुका धामणगाव रेल्वे येथे जिल्हास्तरीय भक्ती शक्ती संगम सोहळा श्रीराम कथा वारकरी अधिवेशन अखंड नामसंकीर्तन सप्ताह दि .17/03/2024 ते 24/03/2024 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व वारकरी संप्रदायातील सर्व भक्त ,पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहे, याबाबतची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष विलास बुटले यांनी गौरक्षण संस्था येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली .याप्रसंगी मंचावर ह. भ. प. श्याम महाराज निचत , ह. भ. प. अक्षय महाराज हरणे (ढाकुलगाव), नंदकिशोर राठी, गजानन पवार प्रमोद पहाडे आयोजन समितीचे कोषाध्यक्ष नितीन कनोजिया व इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष पदाची जबाबदारी बंडूभाऊ मुंदडा यांच्याकडे देण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपुजनाने व ध्वजारोहणाने होणार आहे. ध्वजपूजनासाठी रावसाहेब रोठे, डॉ. सौ. अर्चना रोठे, श्रीनिवास रेड्डी , देवेंद्र वानखेडे व इतर मान्यवर 17 मार्च ला सकाळी 7 वाजता कथास्थळी उपस्थित राहणार आहे.

गौरक्षण संस्थेच्या परिसरात भव्य सभा मंडप उभारण्यात येत असून या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा आयोजन समितीचे अध्यक्ष विलास बुटले नंदकिशोर राठी नितीन कनोजिया व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ह .भ .प. श्याम महाराज निचत, सौ. सविता श्रीकांत गावंडे, वसंतजी बाछुका (अकोला) ,मोहन गावंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी चेतन कोठारी ,पवन बाहाळ, विजय गांधी ,प्रमोद पहाडे रवीभाऊ चौधरी, ह. भ. प. मस्के महाराज व आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

वारकरी अधिवेशनाचा दैनिक कार्यक्रम पहाटे 5 ते 6 – काकडा आरती
सकाळी 8:30 ते 10:30 – हरी किर्तन
सकाळी 10:30 ते 11:30 – व्याख्यान
दुपारी 1 ते 5 – श्रीराम कथा
सायंकाळी 5 ते 6 – हरिपाठ, ध्यान व प्रार्थना
सायंकाळी 7 ते 9 – हरी किर्तन
असे राहील.

ह. भ. प. विदर्भ रत्न श्री संजय जी महाराज पाचपोर हे श्रीराम कथेचे मुख्य प्रवक्ते राहणार आहेत तर किर्तन सेवेत ह .भ .प. लक्ष्मण महाराज कराड, कापरा; ह .भ .प. केशव महाराज चवरे ; ह .भ .प. उमेश महाराज जाधव, नांदगाव खंडेश्वर; ह .भ .प. संदीप महाराज तायवाडे, अमदोर; ह .भ .प. प्रमोद महाराज पानबुडे; ह .भ .प. राजेंद्र महाराज म्हस्के; ह .भ .प. अक्षय महाराज हरणे, ढाकुलगाव; ह .भ .प. गजानन महाराज चऱ्हाटे; ह .भ .प. प्रशांत महाराज ताकोते, अकोला; ह .भ .प. धर्माचार्य नारायण महाराज शिंदे( केंद्रीय सदस्य विश्व हिंदू परिषद) ; ह .भ .प. ज्ञानेश्वर महाराज वाघ, भैरवगड; ह .भ .प. प्रकाश महाराज जवजांळ(सदस्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर); ह .भ .प. सोपान महाराज कनेरकर , मोर्शी.

या आयोजनाकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीत विठ्ठल दादा काठोळे, हितेश गोरिया ,संतोष वाघमारे , बाळकृष्ण पवार ,गजानन दुधे,रवी चौधरी ,सुनील भाऊ जावरकर ,आकाश पनपालिया , गोपाल भुत, श्रीकांत पर्बत, संतोष राजनकर, मंगेश भाऊ सव्वालाखे, नरेंद्र रमावत, अमोल इंजाळकर, गजानन मलबार, मुकिंदा देशमुख, हनुमान प्रसाद पालीवाल, मोहन महाराज देव ,चेतन कोठारी, अंकित पोळ ,कमल छागाणी, पंकज गायकवाड ,विनय शिरभाते, मोहन राऊत ,सुभाष सावंत , अतुल नरेंद्र भोंगे ,महादेव पोकळे ,प्रमोद कुचेरिया, संजय बुधलानी ,अजय हरवानी ,बंटी भाऊ ठाकूर ,विनोद जयस्वाल, धर्मेश सेवक , संजय सायरे, कौस्तुभ पोटदुखे , गिरीश भुतडा, विक्रम बुधलानी, सुमित बोराखडे, अरविंद चनेकर, सतिश बूब, राजूभाऊ देवतळे ,रविश बिरे, सचिन महल्ले, डॉ.अनुप जगताप, डॉ. आकाश येंडे ,राकेश सिंग राठोड ,बाबा भाऊ ठाकूर, विजयराव देशमुख त्यादी सदस्यांचा समावेश आहे.

veer nayak

Google Ad