प्राथमिक शिक्षक समितीचे ग्रामविकास व शालेय शिक्षण मंञ्यांना निवेदन
अमरावती दि.११- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही होण्यास्तव तसेच आंतरजिल्हा शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करणे. शाळेत अतिरिक्त असणाऱ्या समायोजन व पवित्र पोर्टल ने नियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यासंबंधाने संपूर्ण राज्यात एकवाक्यता असणारे शासनदेश शीघ्रतेने निर्गत करणे.अश्या मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी ग्रावविकास मंञी,शालेय शिक्षण मंञी यांना पाठवाले आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे.
पवित्र पोर्टल ने शिक्षण सेवकांची निवड – केल्यानंतर त्यांची शाळांत पदस्थापना होण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना विनंतीने बदलीची संधी देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन मा. मंत्री महोदयांनी वेळोवेळी दिले आहे. तसेच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना सुद्धा याचक्रमाने कार्यमुक्त केले जाईल असेही स्पष्ट केले आहे.या संबंधाने आवश्यक कार्यवाही तातडीने व्हावी आणि लोकसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागण्यापूर्वी आवश्यक कार्यवाही पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मा. मंत्री महोदय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा चालविला आहे. मा. ना. रवींद्र चव्हाण साहेब (पालक मंत्री- सिंधुदुर्ग) आणि मा. आमदार प्रकाशजी आबिटकर साहेब यांनी सुद्धा याबाबत आवश्यक पत्र मा. मंत्री महोदयांना दिलेले आहे.अशी शिक्षक समितीने म्हटले आहे.
परंतु शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. दरम्यानच्या काळात पवित्र पोर्टल ने नियुक्त शिक्षण सेवकांच्या पदस्थापना समुपदेशनाने करण्याचे मा. शिक्षण आयुक्तांचे पत्र निर्गत झाल्यानांत सुद्धा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, जिल्हांतर्गत बदली, आंतरजिल्हा बदलीने नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु असताना- काही जिल्हा परिषदांनी शिक्षण सेवकांच्या पदस्थापनेची कार्यवाही सुरु केली आहे नव्हे पदस्थापनासुद्धा केली आहे. काही जिल्हा परिषदांनी समायोजन केले. तर काही जिल्हा परिषदांनी २१ जून २०२३ चा शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदलीचे नियोजन केले.
त्याच सुमारास शालेय शिक्षण विभागाने सदर विषयास अनुसरून ग्राम विकास विभागाने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश काढण्यासाठी दि. ६ मार्च २०२४ च्या पत्रानुसार ग्राम विकास विभागाकडे विनंती केली.परंतु याबाबत ग्राम विकास विभागाने कोणताच स्पष्ट निर्णय न कळविल्याने राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात आपापल्या स्तरावर निर्णय घेऊन कार्यवाही सुरु झाली. काही ठिकाणी संपन्न झाली.
मात्र अतिरिक्त शिक्षकांना समायोजनातून न्याय देणे, जिल्हांतर्गत विनंती बदल्यांचे सुधारित आणि सुवर्ण मध्य साधणारे धोरण निश्चित करून दुर्गम भागात कार्यरत, दिव्यांग, विस्थापित, एकत्रीकरण मागणाऱ्या आणि बदलीची आवश्यकता असणाऱ्या शिक्षकांच्या सोयीचा विचार होणे गरजेचे असतानाही अद्यापपर्यंत कोणतेच स्पष्ट आणि संपूर्ण राज्यात एकवाक्यता असलेले निर्देश दिलेले नाही. सोबतच आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत अनेक जिल्हा परिषदांनी टाळाटाळ चालविलेली आहे.या सर्व बाबतीत शिक्षक समितीने आग्रही विनंती केली की राज्यात सुरु असलेली प्रक्रिया भिन्नभिन्न असल्याने एकवाक्यता असणारे आवश्यक कार्यवाहीचे निर्देश तातडीने देऊन समायोजन, जिल्हांतर्गत बदली आणि आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तीबाबत न्यायसंगत असे आदेश अत्यंत शीघ्रतेने देण्यात यावे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,शिक्षक नेते उदय शिंदे,राज्यसल्लागार
विजयकुमार पंडित,महादेव पाटील माळवदकर ,राज्य उपाध्यक्ष राजन सावंत,
आनंदा कांदळकर , विलास कंटेकुरे,राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील
राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर ,राज्य संघटक
राजेंद्र खेडकर,सुरेश पाटील,राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील,
सतिश सांगळे,राज्य संपर्क प्रमुख किशन बिरादार,राज्य प्रवक्ता
नितीन नवले,राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर,राज्य ऑडिटर
पंडित नागरगोजे,महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे,नपा-मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,ऊर्दू आघाडी प्रमुख सैय्यद शफीक अली निवेदना व्दारे केली आहे असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.