जर आपल्या गावात कोणी विनाकागदपत्रे मोटारसायकल/वाहन काही दिवसांनकरीता गहाण ठेऊन पैसे घेऊन जात असेल.
किंवा गाडीचे कागदपत्रे 4-5 दिवसांनी देतो या अटींवर गाडी खरेदी केली असेल किंवा कोणी विकत असेल
किंवा फायनान्स ची गाडी आहे म्हणून विनाकागदपत्र कमी पैशात विक्री करीत असेल
किंवा आपल्या गावात किंवा आजुबाजुला कोण्या व्यक्तीकडे 4-5 दिवसांनी नेहमी नवीन – नवीन मोटारसायकल दिसत असेल
किंवा उधारीवर/उसनवारी पैसे घेऊन मोटारसायकल गहाण ठेवत असेल
किंवा आपल्याला संशय असेल कि अमुक व्यक्ती/मुलगा गाडी चोरुन विक्री करीत आहे.
किंवा कोणाकडून आपण गाडी खरेदी केली आहे. परंतु बऱ्याच वेळा कागदपत्रांची मागणी करुन सुद्धा कागदपत्रे देत नसेल. गाडी चोरीची असल्याची आपली खात्री पटली असेल
किंवा गावात किंवा शहरात भंगार दुकानदार यांना मोटारसायकलचे/गाडीचे वेगवेगळे स्पेअर पार्ट काढुन विक्री करीत असेल
किंवा मोटारसायकल वर चुकीचा नंबर टाकून चालवीत असेल किंवा गाडीचा रंग बदलून वापरत असेल
अशी वरीलप्रमाणे काही माहिती असल्यास/आढळून आल्यास तात्काळ खाली दिलेल्या मो.नं. वर संपर्क साधा.