जागतिक महिलादिना निमित्य” प्रबोधन विद्यालयात “उडान” (सन्मान महिला कर्तृत्वाचा) व “रागरंग” (शास्त्रीय संगीत मैफल ) चे नावीन्यपूर्ण आयोजन

0
33
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मानवी जीवनातील स्त्रीचं अस्तित्व आणि महत्व अनन्यसाधारण आहे.आई,आजी,बहीण.मुलगी.पत्नी.आत्या.मावशी.काकू.वाहिणी. मैत्रीण अशा अनेकविध भूमिकांमधून ती मानवी जीवन व्यापून टाकते..तिच्या ममतेंन्.मांगल्यान्..कर्तृत्वान.. संयमिवृत्तीन..समर्पणांन..त्यागानं.. निष्ठेनं.. मानवी जीवन समृद्ध होत..8 मार्च हा दिवस,जगभरातील सर्व स्त्रिजातीच्या सन्मानार्थ “जागतिक महिला दिन ” म्हणून जगभर साजरा केल्या जातो…………………………”जागतिक महिला दिनाचे औचित्य” साधून,स्थानिक प्रबोधन विद्यालयात कार्यरत ,,सर्व महिला शिक्षिकांच्या सेवेचा,,कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या हेतूने,”उडान”(सन्मान महिला कर्तृत्वाचा)…या नाविण्यापूर्ण उपक्रमाचे ,,विद्यालयाच्या वतीने, उत्तम व दर्जेदार आयोजन नुकतेच करण्यात आले…प्रत्येक महिला शिक्षिकेला एक आकर्षक भेटवस्तू देऊन,, प्राचार्य श्री.दत्तात्रय रेवस्कर व पर्यवेक्षक श्री.राजकुमार बावनकुळे यांनी सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान व सत्कार केला…

प्रबोधनच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांदवारे “रागरंग” (शास्त्रीय संगीताची मैफल) या अतिशय दर्जेदार मैफलीचे आयोजन सुद्धा या निमित्ताने करण्यात आलेले होते…..इयत्ता 8 ची विद्यार्थिनी कु वैदेही गजानन सरदार या बालगायिकेने भैरव रागातील “बालमवा रे चुनारिया मे कोलाल रंग दे ” ही विलंबित त्रितातालतील बंदिश उत्तम तयारीसह सादर करून, टाळ्यांच्या रूपात श्रोत्यांचा भरपूर आशीर्वाद मिळवला…”जागो ब्रिज राजकुंवर…नंद के दुलारे ” हा छोटा ख्याल, ताना, आलाप, मिंड, मुरकिसह पेश करून सर्वांची वाहवा मिळवली….”तारिणी नव वसन धारिणी “कट्यार काळजात घुसली मधील “”दिल की तपिश आज हैं आफ्ताब ” ही गायला कठीण नाट्यगिते ,,गायनातील विविध सौंदर्यस्थळासह्, सहज व सुरेल सादर करून उपस्थीताना तृप्त केले…तबल्याच्या साथीला “दर्यापूरचे झाकीर हुसैन ” श्री.जितेश रापर्तीवर व संवादिनीच्या साथीला श्री.गजानन सरदार हे होते…..उपमुख्याध्यापिका कु.शोभाताई भिसे यांच्या अभ्यासपूर्ण व मधाळ निवेदनाने संगीत मैफिलीला वेगळीच रंगत आणली… सौ.माधुरी पवार यांनी सत्काराला व सन्मालाला प्रातिनिधिक स्वरूपात उत्तर देतांना प्राचार्या श्री द.मो.रेवस्कर यांच्या सह उपमुख्याध्यापिका कु.भिसे,पर्यवेक्षक श्री बावनकुळे यांचे आभार मानले….

veer nayak

Google Ad