नारायण नगर विकासाचा प्रश्न ऐरणीवर नागरिकांनी नितीन कदम यांच्यासमोर मांडली व्यथा

0
26
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी/अमरावती :

बडनेरा शहर भागातील स्कूल ऑफ स्कॉलर जवळील नारायण नगर येथील स्वच्छता,सुरक्षितता व विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधींना सूचना देवूनही कायमस्वरूपी तोडगा न निघल्याने नागरिकांनी नितीन कदम यांच्याकडे धाव घेत संपूर्ण वस्तुपरिस्थिति मांडली. दरम्यान नितीन कदम यांनी सदर परिस्थितीचा आढावा घेतला.

स्थानिक नारायण नगरची वास्तविकता बघता येथे नागरिकांना दळणवणाकरिता शहराला जोडणारा मार्ग कच्चा मातीचा असून पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांची मोठी दमछाक होते.येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.रात्रीच्या वेळेला या मार्गाने प्रवास करावयाचा असल्यास येथे रस्त्यावरील दिव्यांची कुठलीही सोय नसून स्थानिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावर रानटी जनावरांची भीती आहे.* *सायंकाळ पासून येथे रानटी जनावरांची रिघ लागते. त्यामुळे स्थानिकांना व वारिष्ट नागरिकांना बाहेर व्यायामाकरिता पडता येत नाही. सदर परिसरात पडीक विहीर असून अद्यापही ती बुजवण्यात आली नाही. लहान मुले स्त्रिया भ्रमण करीत असतांना जीवित हानी होण्याचा प्रकार नाकारता येत नाही.

सूचना ,निवेदने देवूनही या भागाची परिस्थिसती अद्यापही बदललेली नाही. सध्या येथे आरोग्याच्या समस्या बिकट बनल्या आहेत. दोन महिन्यांपासून गटारी स्वच्छ न केल्याने गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिला आहे. साचलेल्या गटारीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. शिवाय रस्त्याबरोबर असणाऱ्या अनेक घरात हे सांडपाणी शिरत आहे. याबाबत महापालिकेला वारंवार सांगण्यात आले. तरीदेखील कचरा व गटारी साफ करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गटारातील घाणीच्या साम्राज्यासह मोकाट प्राण्यांचाही उपद्रव वाढला आहे. याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत होत आहे. भागातील गटारी स्वच्छ करण्यासह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अश्यातच नितीन कदम यांनी तातडीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची चिथावणी आता प्रशासनाला दीली आहे. अन्यथा मनपा अमरावती समोर त्रिवृ निदर्शने करण्याची तयारी दर्शवली आहे.

अमोल साबळे, स्थानिक नागरिक

 

आम्हा नागरीकांना ग्रामीण दुर्गम भागापेक्षा सदर परिस्थिती दैनिय आहे. रस्त्यावरील दिवे, रानटी प्राण्यांचा हैदोस व पडीत विहीर अश्या विविध प्रकारच्या समस्या आम्हाला भेडसावतात.दोन महिन्यापासून गटारी साफ केल्या नाहीत. वारंवार महापालिकेला कळवूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. घाणीमुळे साथीचे आजार बळावत असून भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

नितीन कदम

येथील वास्तविकतेचा आढावा घेतल्यानंतर सदर परिस्थिती माझ्या लक्षात आली. येथील लोकप्रतिनिधी नागरीकांच्या विकास, आरोग्य, सुरक्षितता व मूलभूत सुविधांपासून जाणीवपुर्वक वंचित ठेवलंय की काय? अशी परिस्थिती आहे. याविरोधात कारवाही झाली नाही तर आम्ही मनपा अमरावती येथे उग्र आंदोलन करू.

veer nayak

Google Ad