मंगरूळ दस्तगीर येथे महाशिवरात्रीनिमित्त 1600 दीप लावून साजरा केला दीपोत्सव मंगला माता मंदिर मंगरूळ दस्तगीर येथे साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी मातीची शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाचा अकरा दांपत्याने अभिषेक करून पूजन केले. गेल्या 33 वर्षापासून मंगला माता मंदिर मंगरूळ दस्तगीर येथे सुरू असलेल्या मातीची शिवलिंग तयार करून तिचा दांपत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येतो .
यावेळी मोठ्या संख्येत शिवभक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला .सोबतच 1600 दीप प्रज्वलित करून मंगला माता मंदिराला एक आगळे वेगळे रूप यावेळेस देण्यात आले .
1600 दीपांचा प्रकाशामध्ये मंदिर परिसर प्रकाशमय झाले होते. जिकडे पहावे तिकडे दीपच दीप यावेळी दिसत होते. सर्व दाम्पत्यांनी व भक्तांनी दीप प्रज्वलित केले .
शिवरात्री महोत्सव निमित्त त्या ठिकाणी मंगला मातेच्या आरतीनंतर भक्तांना प्रसाद वितरित करण्यात आला.