माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो

0
34
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शिवशंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचविले. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भुलोकाचा विनाश टाळण्यासाठी भाविकांनी प्रार्थना केली तो दिवस म्हणजे महाशिवरात्री..

 सोबतच आज जागतिक महिला दिन…

अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या ‘बीजमाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचा महिला दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेला गौरव आणि त्यांना मिळालेला ‘नारीशक्ती’ सन्मान ही त्यांच्या आजवरच्या कामाची पोचपावती आहे. गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून त्या संकलित करणे, त्या इतरांना पेरणीसाठी देत त्यांना प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे.. अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन केले आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर त्यांच्या प्रेरणेतून गावरान वाणांची शेती केली जाते. त्यांनी जपलेले बियाणे राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि परराज्यांतही एव्हाना पोहोचले आहे. वांगी, भेंडी, पेरू, आंबा, पालक, मेथी, वाटाणा आदी पिकांच्या जातींची बियाणे त्यांनी निगुतीने जपली. सध्या तीन हजार महिलांसमवेत त्या काम करतात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. विविध ठिकाणी व्याखाने, प्रशिक्षणासाठी त्यांना सतत निमंत्रणे येतात. या महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याला कोटी कोटी वंदन..

आज दिनांक-8 मार्च महाशिवरात्री व महिला दिन निमित्ताने से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा -अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विदयालयाच्या दर्शनी फालकावर “शिवशंभो” यांचे व राहीबाई पोपेरे यांचे चित्र रेखाटन करून या दोनही दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत …

veer nayak

Google Ad