स्थानिक तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे मतदार जनजागृती करण्यात आली तसेच महाविद्यालयाच्या परिसरातून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक वर्गाने मोठ्या संख्येने भाग घेतला होता.
त्याचप्रमाणे पंचप्राण ही शपथ घेण्यात आली आणि आजूबाजूच्या परिसरात मतदान जनजागृती करण्यामागचा उद्देश हाच की लोकांमध्ये मतदान करण्याची आवड निर्माण व्हावी सर्वांनी मतदान करावे आणि लोकशाही जिवंत ठेवावी हा उद्देश समोर ठेवूनच महाविद्यालया तर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी घोषणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत मतदान व लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचा दिसून येतो त्यामध्ये डॉ. नवल पाटील (राष्ट्रीय सेवा योजना सहायक कार्यक्रम अधिकारी) व डॉ. प्रणाली पेटे (महिला कार्यक्रमाधिकारी)यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व लोकांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या तसेच आजूबाजूचा परिसरामध्ये लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग याच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये तसेच रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.