अमरावती येथे इथं आलेल्या गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. भारतातले भिक्खू आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन २४ फेब्रुवारी निघालेली ही अस्थिकलश, धम्मपदयात्रा आज अमरावती येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथे दाखल झाली.यावेळी नितीन कदम यांनी आपली प्रमुख हजेरी लावत अस्थिकलशाचे दर्शन घेतले.श्रीलंकेतून आलेल्या या अस्थिधातू कलशाचे रथातून आगमन झाले असून शहरातील प्रमुख मार्गाने ते सायन्सकोर मैदान येथे पोहोचले आहे.
अडीच हजार वर्षांनंतर भारतात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या अस्थींचे दर्शन घेण्याचा योग बौद्ध अनुयायांना आला. सायंकाळी अमरावती ईथल्या सायंस्कोर मैदान येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.
अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी विदर्भातील विविध गावातील नागरिक व बौद्ध अनुयायींनी मोठी गर्दी केली होती.