चांदूर रेल्वे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, 25 रक्तदात्यांचा सहभाग

0
25
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी

स्थानिक डॉ .पंजाबराव देशमुख जेष्ठ नागरिक संघ रुग्णमित्र संघटना आणि ग्रामीण रुग्णालयाचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती व संत गाडगे महाराज जयंती प्रित्यर्थ सोमवार दि.19 रोजी ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते या शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोकराव देशमुख तर उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शरद पवार गट डॉ. हेमंत देशमुख हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून हरिहर मसतकर ,प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे, भाई देविदास राऊत हे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगे महाराज व डॉ पंजाबराव देशमुख यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली

उद्घाटक प्राध्यापक डॉ.हेमंत देशमुख यांनी फीत कापून शिबिराचे उद्घाटन केले त्यानंतर रक्तदानास सुरुवात झाली त्यामध्ये एकूण 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले समासंगीप्रसंगी मान्यवरांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला प्रतापराव खंडार, विनोद कटणे, विनोद जोशी, रमेश वाट, दीपक जरे, बंडू यादव, किशोर यादव, संजय बाबर, सुरेश मेश्राम, एड.मनोहर देशमुख, प्रा.मोटघरे, विजय सराड, आदी मान्यवरासह असंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश देशमुख, अनिल धनाडे, जुबेर पठाण, गायगोले, आकाश वानखडे, सुबोध रामटेके, डॉ पवार, सिस्टर कीडकाने, चालक निस्ताने, मनोहर राठोड, अमोल दुधाळ, व अशोक महाविद्यालयातील एन.सी.सी पथक यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचा प्रास्ताविक देविदास राऊत व पाहुण्यांचा परिचय भारत गेडाम यांनी केले

veer nayak

Google Ad