स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश हैद्राबाद येथे रुद्रमादेवी मेगा कप चॅम्पियनशिपचे भव्य आयोजन  साउथ चे सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. सुमंत तलवार यांच्या हस्ते कराटेपटूंचा गौरव

0
74
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

हैदराबाद येथे ४ थी नॅशनल ओपन कराटे कुंफू चॅम्पियनशिप २०२४ रुद्रमादेवी मेगा कप, कोटला विजया भास्कर रेड्डी इनडोअर स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले होते, सदरचे आयोजन डॉ. व्ही. रवी टुर्नामेंट चीफ, शिहान लक्ष्मी यांनी केले.

या चॅम्पियनशिप देशातील विविध राज्यातील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये दिल्ली, केरला, कर्नाटका , तेलंगणा, पंजाब, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादी चा समावेश असून तब्बल ५ ते ६ हजार विध्यार्थ्यानी नोंद केली होती. महाराष्ट्र तर्फे धामणगाव तालुक्यातील बोधी बुडोकान कराटेच्या विद्यार्थ्यांनी अलीकडे आयोजित ग्रेट टेस्ट व बेल्ट परीक्षेत यशस्वी होऊन मनोबल उंचावलेल्या धामणगावच्या मास्टर सचिन मून यांच्या कराटे चमूने स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये गोल्ड, सिल्वर, व ब्रॉझ पदक समाविष्ठ आहे. स्थानिक स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या कृष्णा चौधरी याने काता गोल्ड मेडल व कूमीती गोल्ड मेडल प्राप्त केले तर रुकैया बोहरा हिने काता गोल्ड व कुमिति ब्रोंझ मेडल हस्तगत केले तर प्राप्ती सहारे हिने काता सिलवर मेडल जिंकून आपल्या शाळेचे नावलौकिक सम्पूर्ण तालुक्यात केले आहे.

 

या चॅम्पियनशिप मध्ये काता व कुमिती मध्ये धामणगाव येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या रुकैया बोहरा, कृष्णा चौधरी व प्राप्ती सहारे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, और ब्रांज मेडल हे सर्व मेडल पटकाविले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना साउथ चे सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. सुमन तलवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी संपूर्ण यशाचे श्रेय कराटे प्रशिक्षक मास्टर सचिन मुन, सचिन चौधरी, त्यांचे आई वडील, कुटुंबातील सदस्य, मित्र मंडळी, आप्त स्वकीय, शाळेच्या प्राचार्या के साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, सर्व शिक्षक वृंद यांना देत त्यांचे आभार मानले. प्राचार्या के साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

veer nayak

Google Ad