धामणगाव रेल्वे
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे स्वरसाधना संगीत स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते .यामध्ये श्री छत्रपती शिवाजी नगरपरिषद शाळा , सेफला हायस्कूल तसेच स्कूल ऑफ स्कॉलर्स , धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाच्या परीक्षणाचे कार्य प्रणिता देशमुख , संगीत शिक्षिका स्कुल ऑफ स्कॉलर्स, वर्धा यांनी केले . तसेच स्कुल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ येथील सुनील गुल्हाने , हार्मोनियम वादक यांनी हार्मोनियम वर साथ दिली व स्कूल ऑफ स्कॉलर्सचे संगीत शिक्षक गौरव देवघरे यांनी तबल्यावर उत्तम रित्या साथ देऊन या कार्यक्रमास आपली उपस्थित दर्शविली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने गीतांचे गायन केले. या कार्यक्रमात सेफला हायस्कूलची विद्यार्थिनी मनस्वी खडसे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच सेफला हायस्कूलची विद्यार्थिनी काश्मीरा जगतापने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स ची विद्यार्थिनी माही बारूळकर हिने प्राप्त केला. शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा, प्रणिता देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका के साई नीरजा आणि संगीत शिक्षक गौरव देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व गुरुजनांनी कौतुक केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.