धामणगाव रेल्वे
शहराच्या मध्यभागी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना होणार असून परिसराच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते शिवजयंती दिनी करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना व्हावी याकरिता आमदार प्रताप अडसड यांनी पुढाकार घेऊन नगरपरिषदे कडून जिल्हा प्रशासना कडे आलेल्या प्रस्तावानंतर शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे गृह विभागाच्या परवानगी नंतर येथे अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात येईल तत्पूर्वी या परिसर सौंदर्यकीरणाचे भूमिपूजन आ अडसड यांच्या हस्ते शिवजयंती दिनी करण्यात आले
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज डहाके भाजपा शहराध्यक्ष मोहन गावंडे, डॉ. अर्चना रोठे, भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव विलास बुटले, नपचे माजी सभापती सुनील जावरकर, प्रणव लूनावत,विक्रम बुधलानी नरेंद्र चौधरी, अतुल भोगे किसन सूर्यवंशी, , संजय सायरे,सचिन भेंडे, अखिलेश पोळ, किरण निस्ताने, महेंद्रसिंग ठाकूर, आनंद राय निवृत्ती लोखंडे अमोल पवार, अमित मलवार अथर्व शेंडे शरीफ भाई, वैभव देशमुख, निलेश सूर्यवंशी यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते