धामणगावच्या बोधी बुडोकान कराटेपटूनी हेंद्राबाद येथील रुद्रमादेवी मेगा कप वर नावकोरून रचला इतिहास

0
83
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

साउथ चे सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. सुमन तलवार यांच्या हस्ते कराटेपटूंना देण्यात आला रुद्रमादेवी मेगा कप

बोधी बुडोकान च्या विध्यार्थ्यानी महाराष्ट्रासह धामणगाव रेल्वेचे नाव उंचावले

धामणगाव रेल्वे —

 हैदराबाद येथे ४ थी नॅशनल ओपन कराटे कुंफू चॅम्पियनशिप २०२४ रुद्रमादेवी मेगा कप, कोटला विजया भास्कर रेड्डी इनडोअर सटेडियम येथे आयोजन करण्यात आले होते, सदरचे आयोजन डॉ. व्ही. रवी टुर्नामेंट चीफ, शिहान लक्ष्मी यांनी केले. या चॅम्पियनशिप देशातील विविध राज्यातील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये दिल्ली, केरला, कर्नाटका , तेलंगणा, पंजाब, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादी चा समावेश असून तब्बल ५ ते ६ हजार विध्यार्थ्यानी नोंद केली होती. महाराष्ट्र तर्फे धामणगाव तालुक्यातील बोधी बुडोकान कराटेच्या विद्यार्थ्यांनी अलीकडे आयोजित ग्रेट टेस्ट व बेल्ट परीक्षेत यशस्वी होऊन मनोबल उंचावलेल्या धामणगावच्या मास्टर सचिन मून यांच्या कराटे चमूने स्पर्धेत सहभाग घेतला होता यामध्ये एकूण २३ विद्यार्थ्यांचा समावेश होता तर या सर्वच विध्यार्थ्यानी काता व कमिती मध्ये तब्बल ४२ पदक आपल्या नावी केले. त्यामध्ये गोल्ड, सिल्वर, व ब्रॉझ पदक समाविष्ठ आहे. तर आपल्या जिद्दीवर, मेहनतीवर या विध्यार्थ्यानी रुद्रमादेवी मेगा चॅम्पियनशिप आपल्या नावी करत इतिहास रचला. त्यामुळे महाराष्ट्रासह धामणगाव तालुक्याचे नाव या विध्यार्थ्यानी उंचावले आहे.    

सुप्रसिद्ध साउथ चे अभिनेते डॉ. सुमंत तलवार यांच्या हस्ते महाराष्ट्र वआदिलाबाद बोधि बुडोकान कराटे मास्टर मुकेश कुमार, मास्टर पवार मास्टर संध्या, मास्टर प्रितुषा मास्टर प्रेम, मास्टर सचिन मून यांच्या सह विध्यार्थ्यांना रुद्रमादेवी मेगा कप देण्यात आला..

या चॅम्पियनशिप मध्ये काता व कुमिती मध्ये धामणगावचे विद्यार्थी अंकूश लोणारे, नकुल बहादुर, पार्थ कुरकुरे, लखन किरमिरे, प्रज्वल कामडि, कृष्णा चौधरी, रुकीया बोहरा, शरवरी धानके, इशिता पखाले,प्राप्ती सहारे ,आराध्या देऊळकर आर्या वरकट, स्वरा डुबे प्रार्थना कुरकुरे ,निर्मिती सयाम, गौरी गोडे, कनिका चौकीकार ,अनुष्का भगत ,पायल कांबडि ,सोनाली गुप्ता ,नव्या सवंदडे, साक्षी अटलकर, परी लांबट या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतन या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, और ब्रांज मेडल हे सर्व मेडल पटकावून इतिहास रचला आहे.

 सुप्रसिद्ध अभिनेता सुमन तलवार व डॉ. रवी व शीहान लक्ष् (टूर्नामेंट चीफ) यांच्या हस्ते मुख्य प्रशिक्षक सेन्साई सचिन मून ब्लॅक बेल्ट २ दान यांचा ट्रॉफी देऊन सत्कार केला तसेच सचिन चौधरी कराटे (केअरटेकर) यांचे सुद्धा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. 

विध्यर्थ्यांनी संपूर्ण यशाचे श्रेय भंते धम्म सार, मुकेश कांबळे (आदीलाबाद) मास्टर सचिन मुन, मास्टर आकाश पवार, मास्टर संध्या, मास्टर प्रेम कुमार, व प्रतीभा नागलवाडे, यांना देत त्यांचे आभार मानले. तसेच पालकांनी व धामणगावातील नागरिकांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक न्युज पेपर मध्ये प्रकाशित करावे ही नम्र विनंतीl

आपला विश्वासू

मास्टर सचिन मून (क्रिडा/कराटे प्रशिक्षक)

पत्रकार – दैनिक कळंब नगरी व NCR समाचार धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

veer nayak

Google Ad