नितीन कदम यांच्या संकल्प शेतकरी संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न शेतकरी बांधवाकडून फित कापत थाटात उद्घाटन

0
19
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनीधी / अमरावती

नितीन कदम यांच्या संकल्प शेतकरी संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज मोठ्या उत्साहात फटाक्याच्या आतिषबाजीत शेतकरी बांधवाकडून फित कापत उद्घाटन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून नितीन कदम यांनी शेतकरी – शेतमजूर यांच्या विरुध्द होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळ राबविली होती. ही चळवळ व्यवस्थेविरोधात आणखी बळकटपणे लढा देण्याकरिता व भातकुली तालुक्याअंतर्गत नागरिकांच्या समस्या, तक्रारी व आरोग्यविषयक समस्येवरील उपययोजना आखून कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आज संकल्प शेतकरी संघटनेच्या पहिल्या जनसंपर्क कार्यालय निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भातकुली शहर अध्यक्ष प्रफुल्ल महल्ले, विनोद पतालिया, मोहन भातकुलकर यांच्या आयोजन समितिखाली शिवजयंतीच्या पर्वावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यालयं उद्घाटनाची फित कापत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीला वंदन करत आपल्या जनसंपर्क कार्यालय बहुआयामी कार्यपद्धती बद्दल विस्तृत माहिती नितीन कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नितीन कदम म्हणाले की, संकल्प शेतकरी संघटना कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने मला सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी , शेतमजूर, कष्टकरी व समाजातील प्रत्येक घटकासाठी झोकून देऊन काम करण्याकरिता अजून जास्तीचे बळ मिळणार आहे. संकल्प शेतकरी संघटनेच्या सर्वसामान्य जनतेकरिता करत असलेले कार्य आपण सर्वजण पाहतच आहोत. यामुळे आगामी बडनेरा विधानसभा साठी होणाऱ्या निवडणुकीत आम्ही सर्वजण मिळून नवीन संकल्प पर्वाला सुरुवात करणार आहोत. या संकल्प पर्वात जनतेसाठी शहरासाठी अधिकाधिक विकास कामे करण्याकरिता जनतेला गाऱ्हाणी मांडण्यासाठी प्रभागातील नागरिकांना हक्काचे ठिकाण हवे या हेतूने भातकुली तालुक्या अंतर्गत मध्ये जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली आहे. प्रभागातील प्रत्येकजण या कार्यालयात येऊन आपले म्हणणे, तक्रारी व सूचना हक्काने मांडू शकतील. नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक बाबींवर जनसंपर्क कार्यालयाच्या यांच्या माध्यमातून काम करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. असे मनोगत नितीन कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी शेख लतिफभाई, भातकुली शहर अध्यक्ष प्रफुल महल्ले, अशोक मिसाळ, सुभाषराव सवाई, सुधीर देशमुख, नानासाहेब पाटील, विश्वासराव पाटील, गणेश बांबल, विनोद अघम, गणेश काळे, जयंत पवार, राजु चूनकिकर, वासुदेव तिडके, संजय चूनकीकर, अनिल रहाटे, अर्पण भजभुजे,उमेश गाडे, गजानन चूनकिकर, मुन्ना कडू, शफिभाई, जमीरभाई,फैमुद खान, परेश मोहोड, सचिन देशमुख, राहूल वानखडे,सोपान भटकर, नितीन देशमुख, धीरज देशमुख, मोहन भातकुलकर, किशोर जोगी, विनोद पतालीया, बाबुलाल वानखडे, रोशन सनके, शुभम बोरा, सोपान भटकर, ज्ञानेश्वर गाडे, आकाश मानकर, ज्ञानेश्वर पंचबुद्धे, हर्षल घोगडे, विलास रेहपाडे, संजय पवार, सुधीर रेहपाडे, दिनेश रौराळे, बन्सी राठी, राजेश रत्नपारखी, ज्ञानेश्वर झास्कर, गजानन धनवाडे, विनोद पतालिया, रिजवान भाई, स्वप्निल मालाधुरे, चेतन रेपाडे,पर्वेश कदम, अक्षय धूडस, सौ. निशाताई कदम, श्रीमती करूणाताई कदम, वैष्णवी कदम, सोनू कावरे, स्मृती पोटे धुडस व भातकुली तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

veer nayak

Google Ad