धामणगाव रेल्वे गांधी चौक रेल्वे फाटका नजीक युवकाचा रेल्वेने कटून मृत्यू

0
57
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे गांधी चौक रेल्वे फाटक नजीक युवकाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली आहे. कावली येथील 22 वर्षीय युवराज उईके असे या मृत युवकाचे नाव आहे .या युवकाच्या दोन वर्षा आधी बिमारीमुळे वडिलांचा मृत्यू झाला होता .युवराज याला आई व एक मोठी बहीण आहे युवराज याच्याकडे कोणत्याही प्रकारचे शेत नव्हते .घरची परिस्थिती हालाकीची, परंतु शिक्षणात हुशार असणारा हा युवक असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे .युवराज हा मोठी बहीण व आई बरोबर तो राहत होता. सदर घटनास्थळी लोहमार्ग पोलीस पोचले असून पंचनामा करून पुढील कारवाई लोहमार्ग पोलीस करीत आहे

veer nayak

Google Ad