चांदुर रेल्वे :- वसंत पंचमी निमित्त तसेच गायत्री परिवाराचे आचार्य श्रीराम शर्मा यांच्या जयंती चे औचित्य साधून तालुक्यातील गायत्री परिवारातर्फे भव्य दीप यज्ञाचे आयोजन स्थानिक गांधी चौक येथील श्रीदत्त मंदिरात करण्यात आले होते.
दोन दिवसीय या धार्मिक कार्यक्रमात पहिल्या दिवशी भव्य दीप यज्ञ, महिलांची भजन, प्रसाद वितरण करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी एक कुंडी यज्ञ, व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी शहरातील पाच जोडप्यांच्या हस्ते हे यज्ञ विधीचा कार्यक्रम पार पडला.
दरवर्षी मोठ्या उत्सवात होत असलेल्या या धार्मिक कार्यक्रमाचे यज्ञ विधी कार्य इंदुमती राऊत, वर्षा बडवाईक, लता तिखे यांच्या मार्गदर्शनात पार पडले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायत्री परिवारातील मीना कुरळकर, उर्मिला भंडारे, निशा ठवकर, प्रमिला जावळकर, शालिनी मरकाम, नलिनी दरेकर, फुलाबाई पदंराम, सुचिता चव्हाण, प्रणाली देशमुख, चंदा कोरडे, सुनीता दुर्गे आदींनी परिश्रम घेतले.