प्रतिनीधी / अमरावती
श्री संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंतीनिमित्त बडनेरा ग्रामीण भागातली मोगरा येथील बंजारा समाजाच्या देवस्थान परिसरात विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी नितीन कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत संस्थानाचे दर्शन घेतले.त्याचप्रमाणें विश्वस्त मंडळाच्या नागरीकांसमवेत नितीन कदम यांनी संस्थानाच्या विकासाबाबत विस्तृत चर्चा केली.
याप्रसंगी या जयंतीनिमित्त बंजारा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्राम मोगरा येथून बाजारपेठ मार्गे कस्तुरा गावापर्यंत सेवालाल महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बंजारा समाजातील लहान थोरांसह मान्यवर समाज बांधवांनी सहभाग घेवून पारंपारिक वेशभूषात संपूर्ण शहरभर सेवालाल महाराजांचा जयघोष केला.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना नितीन कदम यांनी सांगितले की, सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी संपूर्ण आयुष्यभर सर्वस्वाचा त्याग करुन समाजाला मान-सन्मान प्राप्त करुन दिला. त्यांचा हा त्याग समाजासमोर एक आदर्श असून प्रत्येकांनी त्यांच्या आदेशाच पालन करणे अत्यावश्यक आहे. सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी एकसंघ राहण्याचे आवाहन नितीन कदम यांनी केले.