मंगला माता देवस्थान मंगरूळ येथे आज व उद्या मंगलचंडी यज्ञ …धार्मिक उत्सवापूर्वी सर्व ग्राम देवतांना निमंत्रण…

0
70
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

माहूर च्या आई भवानी रेणुका मातेचे उपशक्तीपीठ असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील  मंगरूळ दत्त येथे श्री.मंगला देवी संस्थान तसेच श्री.मंगलचंडी यज्ञ महोत्सव आयोजन समिती तर्फे ५२ शक्तिपीठात्मक ५२ कुंडीय मंगलचंडी यज्ञ महोत्सव आज दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२४ (शनिवार व रविवार) रोजी आयोजित केलेला आहे.

श्री मंगला माता देवस्थान मंगरूळ दत्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांचे १९४२ ला आगमन झाले होते त्यांनी यावेळी मंगला मातेचे दर्शन घेऊन संघाच्या कार्याचा आढावा सुद्धा घेतला होता या अनुषंगाने  शनिवारी सकाळी ६ वाजता श्रींचा महाभिषेक ८.३० वाजता श्री मंगलादेवी यज्ञ प्रारंभ दुपारी १.३० वाजता सौ. कांचनताई नितीनजी गडकरी यांच्या हस्ते महाआरती तसेच सायंकाळी साडेचार वाजता विज्ञान व चिकित्सा या विषयावर डॉक्टर अनुप देव यांचे मार्गदर्शन आणि सायंकाळी ६.३० वाजता आरती तसेच रविवारी सकाळी ६ वाजता श्रींचा महाभिषेक सकाळी ८.३० वाजता श्री मंगलचंडी यज्ञ पूर्णहुती सकाळी १० वाजता आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते महाआरती व दुपारी  ११.३० पासून सहस्त्र दांपत्य भोजनाचा आयोजन करण्यात आलेले आहे

या धार्मिक उत्सवाच्या पूर्वी  मंगरूळ दत्त येथील श्री गणेश , श्री रामचंद्र, श्री सिद्धेश्वर महादेव ,परब्रह्म पांडुरंग, ग्राम रक्षिणी श्री मातामाय, श्री दत्तात्रेय, श्री मारोतीराय पेठरघुनापूर , श्री परमहंस श्री लहानुजी महाराज,संत बगाजी महाराज, श्री त्रिमूर्ती मंदिरातील संतश्रेष्ठ, आदी सर्व ग्रामदेवतांना विधी वत निमंत्रण पत्रिका  अक्षत तसेच श्रीफळ आणि दुपट्टा  ग्रामदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन अर्पण केला  मंगलचंडी यज्ञ निर्विघ्नपणे सम्पन्न व्हावा तसेच केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण विश्वात सुख शांती समृद्धी समाधान प्राप्त होवो अशी सर्व उपस्थित भक्तांनी प्रार्थना करून सर्व ग्रामदेवतांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेले आहे

याप्रसंगी मंगला माता देवस्थान अध्यक्ष संचालक व  सर्व पदाधिकारी सोबतच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते

veer nayak

Google Ad